Uttarakhand Love Jihad : उत्तराखंड : अब्दुलने एका विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार !
देहराडून (उत्तराखंड) – उत्तरप्रदेशमधील मुरादाबादमधील अब्दुल नावाच्या तरुणाने एका विवाहित हिंदु महिलेला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. महिला उत्तराखंड राज्यातील रामनगर येथील रहिवासी असून अब्दुलने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या वेळी त्याने तिची अश्लील छायाचित्रे काढली.
Uttarakhand Love Ji#ad: Abdul raped a married Hindu woman by trapping her in love!
The Central Government protected the interests of Mu$l!m women by enacting a law against the practice of ‘Triple Talaq’.
However, despite numerous incidents of Love Ji#ad, there is… pic.twitter.com/JpbDTazNJN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 7, 2024
महिलेने अब्दुलवर विवाहासाठी दबाव आणला असता, त्याने विवाह करण्यास नकार दिला. याउलट तिची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. महिलेने पोलीस ठाणे गाठून अब्दुलच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलिसांनी अब्दुलविरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.
संपादकीय भूमिका‘तीन तलाक’ प्रथेविरुद्ध कायदा करून केंद्र सरकारने मुसलमान महिलांचे हित जोपासले; परंतु लव्ह जिहादच्या असंख्य घटना घडूनही हिंदु महिलांच्या हितासाठी त्या विरोधात राष्ट्रव्यापी लव्ह जिहादविरोधी कायदा झालेला नाही. हिंदु महिलांच्या शीलरक्षणार्थ असा कायदा होण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणला पाहिजे ! |