Amarnath Shivling : अमरनाथ गुहेतील बर्फाचे शिवलिंग वितळले !
यात्रा १९ ऑगस्टपर्यंत चालू रहाणार !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – यंदा देशभरात अनेक ठिकाणी विक्रमी उष्णता होती. उष्णतेचा परिणाम अमरनाथ यात्रेवर दिसून आला आहे. ही यात्रा ३० जूनला चालू झाली, त्यानंतर अवघ्या ७ दिवसांत अमरनाथ गुहेतील बर्फामुळे निर्माण होणारे शिवलिंग उष्णतेमुळे वितळले आहे. ‘अमरनाथ श्राइन बोर्डा’ने यू ट्यूबवर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये शिवलिंग वितळल्याला दुजोरा दिला आहे.
अमरनाथ यात्रा चालू झाल्यावर काही दिवसांत शिवलिंग वितळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. वर्ष २००८ मध्ये यात्रा चालू झाल्याच्या १० दिवसांतच शिवलिंग वितळले होते. वर्ष २०१६ मध्ये ते १३ दिवसांत वितळले. गेल्या वर्षी केवळ १४ दिवसांत शिवलिंग वितळले होते. आता अमरनाथला येणार्या भाविकांना केवळ पवित्र गुहेचेच दर्शन घेता येणार आहे. ही यात्रा १९ ऑगस्टपर्यंत चालू रहाणार आहे.