राहुल गांधींच्या हिंदुविरोधी वक्तव्याविरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन !

  • मुंबई जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी आणि अप्पर दंडाधिकारी जयराज कारभारी यांच्याकडे निवेदन

  • राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करून कारवाई करण्याची मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी आणि अप्पर दंडाधिकारी जयराज कारभारी (डावीकडे) यांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ

मुंबई – संसदेत नुकत्याच झालेल्या एका चर्चेत राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले. ‘हिंदु हे हिंसक, खोटारडे आणि द्वेष निर्माण करणारे आहेत’, असे त्यांनी म्हटले. हा समस्त हिंदु समाजाचा अपमान आहे. लोकसभेतून दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणामुळे हे जगभरातील लोकांनी पाहिले. यामुळे हिंदु समाजाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती होत असल्याने सर्वत्रच हिंदु समाजात संतापाची लाट आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करून त्यांच्यावर कारवाई करावी, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीसहित हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने मुंबई जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी आणि अप्पर दंडाधिकारी जयराज कारभारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांकडून हे निवेदन माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाईल.

या वेळी मानव सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, मानव सेवा प्रतिष्ठान बालसंस्कार वर्गाचे मुंबई समन्वयक श्री. अविनाश महाडिक, वज्रदल संघटनेचे श्री. विकास उपाध्याय, श्री. विमलचंद जैन आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार उपस्थित होते.