सप्तर्षी स्तवन विशेषांकाच्या निमित्ताने…

आतापर्यंत जगात अनेक संस्कृती आल्या आणि नष्ट झाल्या. प्राचीन भारतीय सनातन हिंदु संस्कृती लक्षावधी वर्षे टिकून आहे; किंबहुना प्राचीन काळी संपूर्ण पृथ्वीवर हिंदु संस्कृतीच होती. हिंदु संस्कृती ही विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. सनातन हिंदु धर्मसंस्कृतीचे उद्गाते ऋषिमुनी आहेत ! सृष्टीच्या निर्मितीपासूनचा इतिहास आपल्याजवळ आहे. ऋषिमुनी म्हणजेच साक्षात् ईश्वराची निर्मिती होय. मनुष्य आणि देव यांच्यामधील ते दुवा होत ! त्यांच्यापासून मानवाचे पुढील वंश निर्माण झाले. मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचे शोध सर्वप्रथम ऋषींनी लावले. मानवाच्या जीवनोद्धारासाठी अपरिहार्य असणारे वेदांचे ज्ञान त्यांनी समाजापर्यंत पोचवले. त्यागी, तपस्वी अशा ऋषींचे मानवावर अनंत कोटी उपकार आहेत. या विशेषांकाच्या माध्यमातून मानवासाठी देवतासमान असणार्‍या या ऋषींविषयी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया !