ऋषिमुनींचे महत्त्व !
वसिष्ठऋषि, विश्वामित्रऋषि, भृगुऋषि, अत्रिऋषि, अगस्तिऋषि, नारदमुनी इत्यादींची शिकवण आणि नावे युगानुयुगे चिरंतन आहेत. याउलट बुद्धीवान आणि धर्मद्रोही अन् बुद्धीप्रामाण्यवादी यांची नावे १ – २ पिढ्यांतच विसरली जातात. याचे कारण हे की, ऋषिमुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही. याउलट बुद्धीवान आणि धर्मद्रोही अन् बुद्धीप्रामाण्यवादी सांगतात ते सत्य नसल्याने काळाच्या ओघात त्यांची नावे आणि शिकवण विसरली जाते.
‘ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ?’
‘एखादा वरवरचा भौतिक शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे संशोधन करावे लागते. त्यात पुढे इतर शास्त्रज्ञ पालटही करतात. याउलट ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कुणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले