ठाणे येथे धर्मांधांनी बूट घालून प्रवेश केलेल्या मंदिरात हिंदूंकडून महाआरती !
ठाणे – मध्यंतरी एका मुसलमानाने हिंदु युवतीचा विनयभंग केल्यावर ती स्वतःला वाचवण्यासाठी शिवमंदिरात जाऊन लपली होती. हे समजताच धर्मांधांच्या जमावाने तेथे बूट घालून प्रवेश केला, तसेच तिला धमकावले. या प्रकरणानंतर हिंदूंनी ४ जुलैला मंदिरात महाआरती केली.
ठाण्यातील सकल हिंदु समाजाच्या वतीने ३० जून या दिवशी भव्य आंदोलन करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली होती.