द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या प्रसिद्धीत प्रसारमाध्यमांचे मोलाचे योगदान !
अमेरिका, नेपाळसह भारतातील १३ राज्यांतून ३०० अधिक वृत्तपत्रे, वेबपोर्टल (वृत्तसंकेतस्थळे) आणि ५६ हून अधिक वृत्तवाहिन्या, यू ट्यूब, केबल वाहिन्यांनी दिली व्यापक प्रसिद्धी !
द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ फोंडा (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानमध्ये २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडला. या महोत्सवाला मिळालेल्या व्यापक प्रसिद्धीचा गोषवारा येथे देत आहोत.
१. विविध नियतकालिकांनी दिलेली व्यापक प्रसिद्धी
अ. देशातील १३ राज्यांतील ३०० हून अधिक दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, वेबपोर्टल (वृत्तसंकेतस्थळ) आदींनी लेख आणि बातमी यांद्वारे प्रसिद्धी दिली. यात एकूण १००० हून अधिक बातम्या, १०० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
आ. या महोत्सवाची, तसेच महोत्सवातील विविध विषयांची माहिती देण्यासाठी देशभरात एकूण ११ ठिकाणी १७ पत्रकार परिषदाही घेण्यात आल्या. पत्रकार परिषदांच्या वृत्तांना सर्वत्र व्यापक प्रसिद्धी मिळाली.
‘नवभारत’, हिंदी या वृत्तपत्रात खासदार ओवैसींची खासदारकी रहित करण्याविषयी महोत्सवातील ठरावाचे प्रसिद्ध झालेले वृत्त
२. वृत्तवाहिन्या, यू ट्यूब आणि केबल वाहिन्या यांचा प्रतिसाद
अ. ७ राज्यांतील ५६ हून अधिक वृत्तवाहिन्या, यू ट्यूब आणि केबल वाहिन्या आदींनी एकूण ११५ व्हिडिओंच्या माध्यमांतून प्रसिद्धी दिली.
आ. ५ वाहिन्यांनी २ ते ३ दिवस सलग निवडक सत्रांचे थेट (लाईव्ह) प्रसारण केले.
इ. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील १२ वृत्तवाहिन्या, यू ट्यूब वाहिन्यांच्या संपादकांनी हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्यांच्या मुलाखती प्रसारित केल्या.
३. आभार
या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला देशभरातील १७२ वृत्तपत्रे, ९६ वेबपोर्टल, ५६ वृत्तवाहिन्या आणि यू ट्यूब वाहिन्यांनी व्यापक प्रसिद्धी दिली आहे. यात मुख्य प्रवाहातील एकूण ३ आंतरराष्ट्रीय, ५० राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वृत्तपत्रे अन् वेबपोर्टल, तर एकूण ४ मोठ्या वृत्तवाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या यांचे मोलाचे योगदान आहे. ही ज्ञात असलेली माहिती आहे. ज्यांनी प्रसिद्धी दिली; मात्र त्याची माहिती आमच्यापर्यंत पोचली नाही, अशी संख्या मोठी असू शकते. या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला ज्ञात-अज्ञात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीविषयी ‘हिंदु जनजागृती समिती’ अत्यंत आभारी आहे. प्रातिनिधिक स्वरूपात काही निवडक प्रसिद्ध बातम्यांची कात्रणे बाजूला देत आहोत.