UP Minister Appeals To Muslims : मुसलमान दुकानदारांनी कावड यात्रेच्‍या काळात दुकानांना हिंदूंच्‍या देवतांची नावे ठेवू नयेत !

उत्तरप्रदेशाचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांचे आवाहन !

मंत्री कपिल देव अग्रवाल

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कावड यात्रेत मुसलमानांनी त्‍यांच्‍या दुकानांना हिंदूंच्‍या देवतांचे नाव दिल्‍यास अनेक वाद निर्माण होऊ शकतात आणि त्‍यावर अनेकांचा आक्षेपही असू शकतो. तुम्‍हाला हवे ते नाव ठेवा आमचा आक्षेप नाही; पण देवतांची नावे वापरू नका, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी केले आहे. या यात्रेच्‍या संदर्भात येथे आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. श्रावण मासात उत्तरप्रदेशात कावड यात्रा (हरिद्वार येथे जाऊन तेथून गंगाजल आणून शिवमंदिरात अभिषेक करणे) केली जाते.

संपादकीय भूमिका

  • कावड यात्रेच्‍या काळातच नव्‍हे, तर अन्‍य वेळीही मुसलमानांनी हिंदूंच्‍या देवतांची नावे त्‍यांच्‍या दुकानांना ठेवू नयेत, असा कायदाच देशभरात केला पाहिजे !
  • इस्‍लाममध्‍ये मूर्तीपूजा ‘हराम’ (इस्‍लामविरोधी) असल्‍यामुळे धर्मांध मुसलमान हिंदूंना ‘मूर्तीपूजक’ म्‍हणून हिणवतात. याच मुसलमानांना व्‍यापार करून पैसे कमावण्‍यासाठी मात्र हिंदूंच्‍या देवतांचा आधार घ्‍यावा लागतो ! मुसलमानांच्‍या अशा कृतींमुळे ‘इस्‍लाम खतरें में’ येत नाही का ?