Pakistan Social Media Ban : पाकिस्तानमध्ये मोहरमच्या काळात सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्याची मागणी
शिया आणि सुन्नी मुसलमान यांच्यात हिंसाचार होण्याची भीती
इस्लामाबाद (पाकिस्तान) – मोहरमच्या काळात पाकिस्तानमध्ये सामाजिक माध्यमांवर बंदी घातली जाऊ शकते. पाकिस्तानच्या पंजाब राज्यासह इतर अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे. मोहरमच्या काळात हिंसाचार भडकू शकतो आणि सामाजिक माध्यमांवरून द्वेषयुक्त संदेश वेगाने पसरू शकतात, अशी भीती राज्यांना वाटते. ७ जुलैपासून मोहरमला प्रारंभ होणार आहे.
Ban social media during Muharram in #Pakistan. – States appeal to the Center.
Concerned States fear of a possible violent clash between Shia and Sunni Mu$|!m$.
👉 Irrespective of the location, fanatic Mu$|!m$ always indulge in violence.
They attack people of other faiths, and… pic.twitter.com/4R7VgcJ786
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 6, 2024
सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्याचा निर्णय केवळ पंतप्रधान शाहबाज शरीफच घेतील, असे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने एक निवेदन प्रसारित केले आहे. बंदीविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
काय आहे मोहरम ?
मोहरम शिया मुसलमानांचा सण आहे. इस्लामच्या प्रेषिताच्या नातवाच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या वेळी शिया मुसलमान मोठे मेळावे घेतात आणि मिरवणूक काढतात. शिया आणि सुन्नी मुसलमान यांच्यात हाडवैर आहे. त्यामुळेच मोहरमच्या काळात कट्टरतावादी सुन्नी गट शिया मुसलमानांच्या मिरवणुकांना लक्ष्य करण्याच्या घटना घडतात. या काळात पाकिस्तानमध्ये बाँबस्फोट किंवा आत्मघाती आक्रमणेे होण्याची भीती कायम आहे.
संपादकीय भूमिका‘धर्मांध मुसलमान कुठेही असले, तरी ते २४ घंटे हिंसाचार करतात. कधी अन्य धर्मियांवर आक्रमण करतात, तर कधी आपापसांत हिंसाचार करतात. कधी अल्पसंख्यांक असतांना हिंसाचार करतात, तर कधी बहुसंख्य असतांना हिंसाचार करतात’, असे या मागणीवरून कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटू नये ! |