Tamil Nadu BSP President Murder : तमिळनाडूत ‘बसप’चे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची धारदार शस्त्रांनी हत्या !
चेन्नई – बहुजन समाज पक्षाचे (बसपचे) तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची ६ आक्रमणकर्त्यांनी निर्घृण हत्या केली आहे. (द्रमुकच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे ही घटना दर्शक आहे ! – संपादक) आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर बसले असतांना त्यांच्यावर अचानक ६ जणांनी धारदार शस्त्रांनी आक्रमण केले. आर्मस्ट्राँग यांना रक्तबंबाळ स्थितीत रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आक्रमण केल्यानंतर आक्रमणकर्ते पळून गेले. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत. आर्मस्ट्राँग यांची हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.