राहुल गांधी यांनी हिंदु धर्मियांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदन

राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधले !

कोल्हापूर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी देण्यात आले.

(क्लिक करा ↑)

कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

१. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले. या प्रसंगी ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा दुधाणे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, अखिल भारत हिंदु महासभेचे श्री. विकास जाधव, शिवसेना विभागप्रमुख श्री. लक्ष्मण लाड, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, विजय मोरे, जी.आर्. काशीद, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. प्रीतम पवार उपस्थित होते.

गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

२. गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भाजप विस्तारक आणि सरचिटणीस श्री. संदीप नाथ बुवा, बजरंग दलाचे श्री. विश्वनाथ पाटील, श्री. रविकांत कुलकर्णी, श्री. संजय पोवार यांसह हिंदु जनजागृती समितीचे साधक उपस्थित होते.

निपाणी येथे उपतहसीलदार मृत्यूंजय डंगी (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

३. निपाणी (जिल्हा बेळगाव) – निपाणी येथे उपतहसीलदार मृत्यूंजय डंगी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘सृष्टी होमिओपॅथी’चे डॉ. चंद्रशेखर खोत, ‘नॅशनल कॉम्प्युटर’चे श्री. रवींद्र खोत, व्यावसायिक श्री. उत्तम मोहिते आणि श्री. रोहन राऊत, योगगुरु श्री जे.डी. शिंदे, ‘सिद्धांत जिम’चे श्री. राजू हिंग्लजे, चित्रकार श्री. गणेश जाधव, ‘गुरुकुल अकॅडमी’चे श्री. चारुदत्त पावले, श्रीराम सेना कर्नाटकचे निपाणी ग्रामीण तालुकाप्रमुख श्री. अमोल चेंडके, बजरंग दल इचलकरंजी जिल्हा सहसंयोजक श्री. अजित पारळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रवींद्र  महादेव शिंदे आणि श्री. राजेश आवटे, धर्मप्रेमी श्री. अभिनंदन भोसले, वारकरी महामंडळाचे श्री. बाबुराव महाजन महाराज, सर्वश्री स्वप्नील पोतदार, प्रशांत घोडके, नामदेव मुसळे, अनील परीट, पवन हात्रोटे, संतोष मोरे यांसह अन्य उपस्थित होते.