मुंबईतील मरिन ड्राईव्हच्या रस्त्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट आणि चपला यांचा खच !
|
मुंबई – टी-२० क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा मरिन ड्राईव्ह परिसरात ४ जुलैला पार पडला. या वेळी लाखो मुंबईकर तेथे जमले होते. या सर्वांनी खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट, चपला आणि इतर वस्तू तेथेच टाकल्याने रस्त्यावर पुष्कळ कचरा साठला होता. हा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेला २ मोठे डंपर आणि ५ लहान जीप यांचा वापर करावा लागला. रात्री ११.३० वाजल्यापासून चालू झालेली ही स्वच्छता मोहीम ५ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत चालूच होती. यात १०० हून अधिक कामगारांना श्रम करावे लागले.
संपादकीय भूमिका
|