‘हिंदुस्थान पेट्रोलियम’कडून कोल्हापूर बसस्थानकावर प्रवाशांना कापडी पिशव्यांचे वाटप !
कोल्हापूर – हिंदुस्थान पेट्रोलियमकडून ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ या अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर बसस्थानकावर ३ जुलैला ‘स्वच्छता पंधरवडा २०२४’ हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी बसस्थानकावरील प्रवासी आणि कर्मचारी यांना प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी कोल्हापूर आगाराचे आगार व्यवस्थापक अनिल मेहत्तर, ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’चे महेश विरकुड, विकास खोत, साहाय्यक वाहतूक निरीक्षक दीपक घारगे यांसह अन्य उपस्थित होते.