चंद्रपूर येथील सौ. भारती पवार यांना सत्संगसेवक शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मराठी सत्संगसेवक शिबिरा’मध्ये सहभागी झाले होते. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. भारती पवार

१. श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आम्हाला ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ समजावून सांगत असतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच शिकवत आहे’, असे जाणवून माझा भाव जागृत झाला.

२. व्यासपिठाकडे पाहिल्यावर ‘तेथून साधकांकडे ऊर्जा प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

३. श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) नामजपादी आध्यात्मिक उपायांविषयी सांगत असतांना माझी भावजागृती झाली.

४. सौ. संगीता पाटील या भावजागृतीचा प्रयोग घेत असतांना ‘श्री गुरुमाऊलींचे प्रत्यक्ष दर्शन होत आहे’, असे मला जाणवले आणि माझा भाव जागृत झाला.’

– सौ. भारती पवार (वय ६४ वर्षे), चंद्रपूर (२१.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक