Netflix Maharaj : हिंदुद्वेषी ‘महाराज’ चित्रपटाला प्रसिद्धी मिळण्यासाठी ‘नेटफ्लिक्स’ने घेतले इस्लामी देशांचे साहाय्य !
मुंबई – ‘महाराज’ हा चित्रपट एका मोठ्या सामाजिक समस्येला वाचा फोडणारा चित्रपट आहे, हे दाखवण्यासाठी आणि हिंदुद्वेषी अभिनेता आमिर खान याचा मोठा मुलगा जुनैद खान याचे नाव जगभरात पोचवण्यासाठी ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी’वर प्रसारण करणार्या कंपनीला भारताच्या २ शेजारी इस्लामी देशांचे विशेष साहाय्य मिळाले आहे, अशी माहिती ‘अमर उजाला’च्या संकेतस्थळावर प्रसारित झाली आहे. ‘महाराज’ चित्रपटाला जागतिक क्रमवारीत आणण्यासाठी ‘नेटफ्लिक्स’ने पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतील सामाजिक माध्यमांवर त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आहे. हा चित्रपट सर्वाधिक पाहिला जात असलेल्या १४ देशांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे. ‘महाराज’ या चित्रपटात हिंदु संताला खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. यामुळे या चित्रपटाला भारतातील हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता.
.@Netflix and @yrf conspire to propagate Maharaj film wherein a Vaishnav saint is shown in bad light
Pakistan, Bangladesh, Maldives and 14 other I$lamic or Mu$lim dominated countries is where the viewership for Maharaj spiked, pushing it into the global top 10!
Hindus need to… pic.twitter.com/xtPo3peKrB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 5, 2024
‘महाराज’ या चित्रपटावर गुजरात उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती उठवल्यानंतर २१ जून या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला भारतीय माध्यमांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. भारताव्यतिरिक्त हा चित्रपट सध्या पाकिस्तान, बांगलादेश आणि मालदीव येथे पहिल्या क्रमांकावर आहे. बहरीन, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये हा चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद याला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी ही संपूर्ण रणनीती अतिशय विचारपूर्वक सिद्ध करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
संपादकीय भूमिका
|