Free Palestine Banners : ऑस्ट्रेलियाच्या संसदेच्या छतावर ‘फ्री पॅलेस्टाईन’चे फलक !
मुसलमान महिला संसद सदस्य निलंबित
कॅनबेरा – ऑस्ट्रेलियात नुकतेच पॅलेस्टिनी समर्थक आंदोलकांनी संसदेच्या छतावर ‘फ्री पॅलेस्टाईन’चे फलक फडकावले. ऑस्ट्रेलियातील वृत्तवाहिनी ‘एबीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, काळे कपडे घातलेले ४ लोक पटकन संसदेत घुसले आणि छतावर गेले आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा देऊ लागले. त्यांच्या हातात ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिलेले फलक होते. आंदोलकांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यावर युद्धात इस्रायलला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. आंदोलन चालूच रहाणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. सुरक्षा कर्मचार्यांनी आंदोलकांना संसदेतून बाहेर काढले.
Protesters display ‘Free Palestine’ and pro-Gaza banners on the roof of the Parliament of Australia.
A Mu$|!m female parliamentarian, recently faced expulsion for supporting ‘Free Palestine’ cause.
Mu$|!m politicians globally, ignoring their national or party’s ideology, are… pic.twitter.com/gPkhkI6GyA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 5, 2024
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या सरकारने त्यांच्या पक्षातील मुसलमान खासदार फातिमा पेमन यांना निलंबित केले होते. पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ‘ग्रीन पार्टी’ने आणलेल्या प्रस्तावाला फातिमा यांनी पाठिंबा दिला होता.
संपादकीय भूमिकापॅलेस्टाईनमधील लोकांसाठी जगभरातील मुसलमान राजकारणी त्यांचा पक्ष आणि अन्य गोष्टी विसरून पाठिंबा देतात. हिंदु लोकप्रतिनिधी कधी हिंदूंच्या समस्यांसाठी असे संघटित होतात का ? |