रशियाने भारताला ३६ सहस्रांहून अधिक ‘एके-२०३ असॉल्ट रायफल्स’ दिल्या !
मॉस्को (रशिया) – पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाच्या दौर्यावर जाणार आहेत. ८ ते १० जुलै या कालावधीत ते २ देशांना भेट देणार आहेत. रशियानंतर ते ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे जाणार आहेत. शिखर परिषदेच्या आधी रशियाने घोषित केले आहे की, ‘इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ने ३५ सहस्रांपेक्षा अधिक ‘मेड इन इंडिया’ ‘एके -२०३ असॉल्ट रायफल्स’चे उत्पादन केले असून त्या भारतीय सैन्याकडे सुपुर्द केल्या आहेत.
एके-२०३ ही रशियाच्या प्रसिद्ध एके-४७ असॉल्ट रायफलची आधुनिक आवृत्ती आहे. एके रायफल्स या त्यांची विश्वासार्हता, टिकाऊपणा आणि कारवाईतील सुलभता, यांसाठी ओळखल्या जातात. ही रायफल ५०० ते ८०० मीटरपर्यंत गोळीबार करू शकते. ती एका मिनिटात ७०० फैरी झाडू शकते.