पुणे प्राधिकरणाकडे होर्डिंगच्या संमतीसाठी २०० हून अधिक अर्ज !
पिंपरी – होर्डिंगला संमती मिळावी यासाठी पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाकडे (पी.एम्.आर्.डी.ए.) २०० हून अधिक अर्ज प्रविष्ट (दाखल) झाले आहेत. राज्यात होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न उपस्थित झाला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
पी.एम्.आर्.डी.ए.ने केलेल्या सर्वेक्षणात १ सहस्रहून अधिक अनधिकृत होर्डिंग आढळली असून संबंधित होर्डिंगधारकांना संमती घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. मुळशी येथे अनधिकृत होर्डिंगवर केलेल्या कारवाईमुळे अनधिकृत होर्डिंगधारकांनी अनुमतीसाठी अर्ज केले आहेत. अर्ज न केलेल्या होर्डिंगवर कारवाई होईल, तसेच होर्डिंगच्या संमतीसाठी प्रविष्ट झालेल्या अर्जांचीही छाननी होणार आहे, असे पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पी.एम्.आर्.डी.ए. अंतर्गत १७ हून अधिक गावे असून त्यातील पालखी मार्गावरील होर्डिंग्ज काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते. प्रविष्ट झालेल्या अर्जांची निश्चिती करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पी.एम्.आर्.डी.ए.चे महानगर नियोजनकार सुनील मरणे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :
|