राहुल गांधी यांच्या विरोधात नवी मुंबईत ‘जोडे मारा’ आंदोलन !
नवी मुंबई – हिंदु धर्माचा अपमान करणारे राहुल गांधी म्हणजे विकृत व्यक्ती आहेत. लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या लोकसभेत काँग्रेसचा बालीश बुद्धी नेता राहुल गांधी याने हिंदु धर्मीय हिंसक आहेत, असे वक्तव्य करून देशातील बहुसंख्य कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, अशी टीका बजरंग दलाचे नवी मुंबईचे सहसंयोजक शंकर संगपाळ यांनी केली. राहुल गांधींच्या हिंदुविरोधी वक्तव्याच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने नवी मुंबईत सीवूड्स स्थानकात त्यांच्या छायाचित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे नवी मुंबई जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील, अमरजीत सुर्वे, बजरंग दल सहसंयोजक शंकर संगपाळ, तेजस पाटील, हिंदुत्वनिष्ठ सुरेशसिंग राणा, डी.के. सिंह, तसेच मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसींनी भारताचा अपमान केला आहे ! – स्वरूप पाटील, नवी मुंबई जिल्हा सहमंत्री, विश्व हिंदु परिषद
अयोध्येतील श्रीराम मंदिराला विरोध करणे, भगवा आतंकवाद संबंधणे, भारतीय सेनेकडे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागणे, ‘जेएनयू’ विद्यापिठात देशविरोधी घोषणा देणार्या फुटीरतावादी विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे अशा विविध गोष्टी आणि वक्तव्ये करून केवळ हिंदु धर्माचा नव्हे, तर भारताचाही अपमान केलेला आहे.