क्रिकेटपटूंना पहाण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर !
मुंबई – भारत ‘टी-२० विश्वचषक’ जिंकल्यावर विजेता संघ ४ जुलैला भारतात परतला. सायंकाळी मुंबईत विजेत्यांचा ओपन डेक (छप्पर नसलेल्या) बसमधून ‘रोड शो’ होणार होता. नंतर मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर संघ विजयाचा जल्लोष करणार होता. त्यांना पहाण्यासाठी मुंबईतील मरिन ड्राईव्हवर लाखो मुंबईकरांची गर्दी झाली होती. त्यामुळे तेथे वाहतूक खोळंबली होती. शेवटी ‘गर्दी करू नका’, असे मुंबई पोलिसांना आवाहन करावे लागले.
संपादकीय भूमिकाक्रिकेटपटूंनी भारताला ‘विश्वचषक’ मिळवून दिला, याचा अभिमान आहेच; परंतु राष्ट्रासमोर आतंकवाद, नक्षलवाद, बलात्कार इतक्या भीषण समस्या असतांना लाखो युवकांनी त्यांच्या स्वागतासाठी वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे अयोग्यच ! |