राहुल गांधींवर कारवाई करा !
|
नंदुरबार – हिंदु जनजागृती समितीने नंदुरबार निवासी उपजिल्हा अधिकारी हरीष भामरे यांच्या माध्यमातून राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वश्री मयूर चौधरी, हर्षल देसाई, जितेंद्र मराठे आणि विजय जोशी उपस्थित होते.