ललित पाटील याला पसार होण्यास साहाय्य करणारे २ पोलीस हवालदार बडतर्फ !
पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील याला ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तून पसार होण्यास साहाय्य करणार्या पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. या प्रकरणी पोलीसदलातील काही कर्मचारी आणि अधिकारी यांचे निलंबन करण्यात आले होते. अन्वेषणामध्ये दोषी आढळून आलेल्या २ जणांवर कारवाई केली. या प्रकरणात ‘ससून’मधील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांसह १५ जणांवर ३ सहस्र १५० पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांनी आरोपीला पळू देणे हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! |