जैन आचार्य विराग सागर महाराज यांचा देहत्याग !
छत्रपती संभाजीनगर – जैन आचार्य विराग सागर महाराज (वय ६३ वर्षे) यांचे ३ जुलैच्या पहाटे २ वाजून २४ मिनिटांनी सिंदखेडराजा येथे देहत्याग केला. त्यांनी आजवर ५३० जैन साधूंना दीक्षा दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अरिहंतनगर जैन मंदिरात ते १ साधूंसह चातुर्मासानिमित प्रथमच येणार होते.
विराग सागर महाराज यांनी ४० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये दीक्षा घेतली होती. वर्ष २००७ मध्ये त्यांनी ३ आचार्यांना शहरात येऊन दीक्षा दिली. १६ मार्च या दिवशी ते मध्यप्रदेशातील पन्ना येथून निघाले होते. १०८ दिवसांचा पायी प्रवास करून ते सिंदखेडराजा येथे पोचले होते. मध्यरात्री दीड वाजता उठून त्यांनी साधना केली. साधू संघाशी संवाद साधला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी देहत्याग केला.
‘जैन समाजातील वरिष्ठ आचार्य विराग सागर महाराजांना वंदन करण्यासाठी देशभरातून जैन बांधव येणार आहेत’, असे सकाल जैन समाजाचे पदाधिकारी महावीर पटणी यांनी सांगितले.