‘माझी लाडकी बहीण योजने’चे लाभ कुणाला मिळणार ?
महाराष्ट्र सरकारच्या या योजनेनुसार महिलांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये थेट त्यांच्या अधिकोषातील खात्यांमध्ये जमा होणार आहेत. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० सहस्र रुपयांपेक्षा अल्प हवे. त्यात विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना याचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळणार असून लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. ही लाभ योजना २१ वर्षांवरील ते ६५ वर्षांच्या खाली महिलांना मिळेल.
या योजनेचे लाभ कुणाला मिळणार नाहीत ?
ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, सरकारी (राज्य आणि केंद्र) किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत आहे, कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार असेल आणि कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे ५ एकरपेक्षा अधिक शेतभूमी, चारचाकी वाहने असतील, अशा कुटुंबातील महिलांना तसेच निवृत्तीवेतन घेणार्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.