आजपासूनच नामस्मरण करण्याचे महत्त्व !
देह केव्हा जाईल, याचा नेम नाही. मग ‘म्हातारपणी नामस्मरण करू’, असे म्हणू नये. अगदी ‘उद्यापासून नामस्मरण करू म्हटले’, तर उद्याची तरी खात्री आहे का ? आयुष्य क्षणभंगूर आहे, ही खात्री प्रत्येकाला आहे; म्हणून तर प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल, याची काळजी नसते; पण घरातील माणसांना फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागूया. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊया.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)