S Jaishankar : परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट
सीमा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर दोघांची सहमती
अस्ताना (कझाकिस्तान) – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची येथे भेट झाली. डॉ. जयशंकर यांनी वांग यांना सांगितले की, वास्तविक नियंत्रण रेषेचा (एल्.ए.सी.चा) आदर करणे आणि सीमावर्ती भागांत शांतता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमधील संबंध हे परस्पर आदर, स्वारस्य आणि संवेदनशीलता यांवर आधारित असले पाहिजेत.
Met with CPC Politburo member and FM Wang Yi in Astana this morning.
Discussed early resolution of remaining issues in border areas. Agreed to redouble efforts through diplomatic and military channels to that end.
Respecting the LAC and ensuring peace and tranquility in the… pic.twitter.com/kR3pSFViGX
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 4, 2024
डॉ. जयशंकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, आज सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. सीमाभागातील उर्वरित प्रश्न लवकर सोडवण्याविषयी चर्चा केली. राजनैतिक आणि सैनिकी माध्यमांतून या दिशेने दुप्पट प्रयत्न करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.
EAM Dr. S. Jaishankar meets the Foreign Minister of China.
‘Respecting LAC essential’- Both parties agree to step up efforts in resolving the border dispute.
India is well aware of how deceitful China is at keeping promises.#Geopolitics #WorldNews pic.twitter.com/7OyIjivBuq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2024
संपादकीय भूमिकाचीनने कितीही सहमती दर्शवली, तर त्याच्यावर कुणी विश्वास ठेवू शकत नाही, हे भारतालाही आता लक्षात आलेले आहे ! |