N K Singh : पुढील युग भारताचे असून जग यामध्ये प्रवेश करण्याच्या उंभरठ्यावर ! – जगविख्यात अर्थतज्ञ एन्.के. सिंह
भारत वर्ष २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनणार !
नवी देहली – पुढील युग हे भारताचे असून जग या युगात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त होईल, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’कडून प्रतिष्ठित मानद शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ एन्.के. सिंह यांनी त्यांच्या भाषणात केले.
World is at point of ushering in India era as country’s growth trajectory moves towards a developed nation status by 2047 – Economist N K Singh
Conferred prestigious Honorary Fellowship at the London School of Economics
👉 It is imperative for India to have Dharmic principles… pic.twitter.com/LR6OfABRwd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2024
‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ने सांगितले की, सिंह यांचे आमच्यासमवेतचे दीर्घकालीन आणि वचनबद्ध नाते, तसेच आमच्या भारत सल्लागार मंडळाचे सह-अध्यक्ष या नात्याने सिंह यांनी भारतासमवेतचे संबंध अधिक दृढ केले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचा हा सन्मान आहे.
पुरस्कार स्वीकारतांना ८३ वर्षीय अर्थतज्ञ असलेले सिंह म्हणाले की,
१. देशाचा गौरवशाली इतिहास आणि त्याच्या स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्धापनदिनानिमित्त उच्च वाढीची अर्थव्यवस्था म्हणून देशाचे प्रयत्न अधोरेखित होतील.
२. पंतप्रधान मोदी यांचा हा तिसरा कार्यकाळ असून ते आणि मंत्री परिषदेचे सर्व सदस्य वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारतासाठी पूर्णपणे कटीबद्ध आहेत. पुढील दोन दशकांसाठी भारताला अशी गती राखणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाभारताने केवळ आर्थिक महासत्ता बनून चालणार नाही. याचे कारण गेल्या १०० वर्षांत इंग्लंड, रशिया आणि अमेरिका यांच्या धर्मविहीन भौतिक विकासाने त्या देशांना खिळखिळेच केले. भारताने हिंदु धर्माचा आधार घेत भौतिक विकास केला, तरच त्याची स्थिती काही शेकडो वर्षे तरी जगावर राज्य करण्याच्या पात्रतेची असेल, हे लक्षात घेतले पाहिजे ! |