Bihar Bridge Collapse : सिवान (बिहार) येथील गंडकी नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला !
बिहारमध्ये १५ दिवसांत कोसळले ७ पूल !
सिवान (बिहार) – येथील गंडकी नदीवरील पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना ३ जुलैला सकाळी घडली. यात कुणीही घायाळ झाले नाही. या घटनेची चौकशी केली जात आहे. गंडकी नदीवरील हा छोटा पूल अनेक गावांना महाराजगंजशी जोडतो. गेल्या १५ दिवसांत बिहारमधील पूल कोसळण्याची ही ७ वी, तर सिवान जिल्ह्यातील गेल्या ११ दिवसांतील दुसरी घटना आहे.
A part of the bridge over the Gandaki river in Siwan (Bihar), collapses; 10th bridge collapse in over 15 days
Bihar, infamously known as ‘Jungle Raj’, is now egregiously called the ‘State of Collapsing Bridges’.
Sadly, neither the Government nor the Administration is ashamed of… pic.twitter.com/hV5j7CfqnZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2024
१. मिळालेल्या माहितीनुसार या पुलाची उभारणी वर्ष १९८२-८३ मध्ये झाली होती. त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू होते. त्यातच मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाहातील पाण्यामुळे पुलाची रचना कमकुवत होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती.
२. यापूर्वी २२ जून या दिवशी दारुंडा भागातील नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला होता. बिहारमधील मधुबामी, अरारिया, पूर्व चंपारण आणि किशनगंज या जिल्ह्यांतही गेल्या २ आठवड्यांत पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
संपादकीय भूमिका‘जंगलराज’ म्हणून कुप्रसिद्ध असणारा बिहार आता ‘कोसळणारे पूल असणारे राज्य’ म्हणूनही कुप्रसिद्ध होत आहे. याची लाज ना सरकारला, आहे ना प्रशासनाला ! |