Rafah War : गाझातील राफाहमध्ये ९०० आतंकवादी ठार ! – इस्रायचे सैन्यदलप्रमुख
तेल अविव – इस्रायलने मे महिन्यात गाझाच्या दक्षिणेकडील राफाह भागात आक्रमण केले होते. या आक्रमणात आतापर्यंत ९०० आतंकवादी मारले गेले आहेत. इस्रायलचे सैन्यदलप्रमुख हर्झी हालेवी यांनी ही माहिती दिली. हालेवी पुढे म्हणाले की, राफाहमधील पायाभूत सुविधा नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम पुढील काही सप्ताहांत पूर्ण केली जाईल. इस्रायलने भूमीवरून आक्रमण चालू करण्यापूर्वी पॅलेस्टिनींनी बाँबस्फोटांपासून वाचण्यासाठी राफाहमध्ये आश्रय घेतला होता.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा पूर्णपणे नाश होईपर्यंत युद्धविराम नाही, अशी शपथ घेतली आहे. हमासच्या आक्रमणानंतर इस्रायलचे सैन्य गाझामध्ये सातत्याने आक्रमण करत आहे. या आक्रमणात आतापर्यंत सुमारे ४० सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.