खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला खासदारकीची शपथ घेण्यासाठी पॅरोल संमत !
(पॅरोल म्हणजे बंदीवानाला काही दिवसांसाठी अटींवर कारागृहाबाहेर सोडणे)
दिब्रूगड (आसाम) – येथील कारागृहात बंद असलेला खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह हा पंजाबमधील खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडून आला आहे. त्याला लोकसभेत शपथ घेण्यासाठी पॅरोल संमत करण्यात आला आहे. अमृतपाल ५ जुलै या दिवशी शपथ घेण्याची शक्यता आहे. त्याला लोकसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ दिली जाऊ शकते.