कोल्हापूर येथे हिंदूंना ‘हिंसक’ म्हणणार्या राहुल गांधी यांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
कोल्हापूर – हिंदु देवतांचा वापर करून हिंदूंना ‘हिंसक’ म्हणणार्या काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचा भाजप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने उंचगाव येथे निषेध करण्यात आला आहे. या प्रसंगी भाजप युवामोर्चा दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री. विजय गुळवे, सर्वश्री विनायक जाधव, उमेश देशमुख, अर्जुन मुदुगडे, अनिल पंढरे, अनिल शिंदे, राजेंद्र संकपाळ, उमेश पाटील, स्वप्नील अडसूळ, दीपक मुदुगडे यांसह अन्य उपस्थित होते.