सनातनचे द्वितीय बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांचे सूक्ष्मातील कार्य !
१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सनातनचे द्वितीय बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) काही खेळ न खेळता सलग ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे ऑनलाईन प्रसारण बघत होते.
२. दुसर्या दिवशी पू. वामन खेळण्यातील विविध प्राण्यांचे युद्ध लावण्याचे खेळ खेळत होते. या संदर्भात त्यांनी त्यांच्या आईला (सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे यांना)) सांगितले, ‘‘आज सूक्ष्मातील युद्धाची आवश्यकता आहे.’’
३. दुपारच्या वेळी ते चित्रीकरण करण्याचा खेळ खेळत होते. प्रत्यक्षात त्या वेळी महोत्सवात छायाचित्रे काढण्यात विविध अडचणी येत होत्या. यांतून ‘पू. वामन सूक्ष्मातून कार्य करून वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील अडथळे न्यून करत आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२४)
|