२१ जुलैपर्यंत पंढरपूर येथे वारीसाठी जाणार्या सर्व वाहनांना पथकर माफ !
मुंबई – गतवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे वारीसाठी वाहनांसाठी पथकरमाफ (‘टोल फ्री’) घोषित केली असून त्याचा लाभ २१ जुलैपर्यंत वारकर्यांना मिळणार आहे. वारीत सहभागी असलेल्या वाहनांना परिवहन विभागातून ‘स्टीकर्स’ दिले जाणार आहेत. आवश्यकता वाटल्यास सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी वारीतील वाहने सोडून अन्य अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याचसमवेत खासगी वाहनांसमवेत राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांनाही पथकरातून सवलत देण्याची सूचना राज्यशासनाने दिली आहे.
आषाढीच्या कालावधीत भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत आकर्षक विद्युत् रोषणाई !
१७ जुलैला असलेल्या आषाढीच्या निमित्ताने भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत् रोषणाई केली जाणार आहे. पालखी सोहळा पंढरपूर येथे पोचल्यावर इसबावी, चंद्रभागा वाळवंट, भाविकांचे निवासस्थान, ६५ एकर परिसर अशा सर्व ठिकाणी ही विद्युत् रोषणाई केली जाणार आहे. यासाठी सोलापूर प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी जागांची पहाणी केली असून हे सोहळे निघण्यापूर्वी रोषणाई पूर्ण केली जाणार आहे. यंदा प्रथमच अशा प्रकारची रोषणाई केली जाणार असून अवघा महाराष्ट्र सध्या वारीमय झाला आहे.