Tahawwur Rana : मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील आतंकवादी तहव्वूर राणा याचे भारताकडे होऊ शकते प्रत्यार्पण !
वॉशिंग्टन (अमेरिका) – मुंबईत वर्ष २००८ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणातील पाकिस्तानी वंशाचा पसार आतंकवादी तहव्वूर राणा सध्या अमेरिकेच्या कह्यात आहे. अमेरिका-भारत प्रत्यार्पण करारानुसार आता राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. अमेरिकेच्या एका अधिवक्त्याने न्यायालयात ही माहिती दिली.