पुणे येथे भक्ती-शक्ती संगमासाठी आलेल्या पू. संभाजी भिडेगुरुजी यांना पोलिसांची नोटीस !
पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्या, तसेच तेढ निर्माण करणारे भाषण करू नका, अशा स्वरूपाची नोटीस पुणे पोलिसांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांना बजावली.
‘वटसावित्रीच्या पूजेला साडी नेसलेल्या महिलांनीच जावे’, असे केले होते विधान !
‘वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ‘ड्रेस’ घातलेल्या महिलांनीसुद्धा जाऊ नये. या पूजेला साडी नेसलेल्या महिलांनीच जावे. वारकरी-धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करण्याचा आपला मानस आहे’, असे मार्गदर्शन पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केले. ते पुणे येथील कार्यक्रमात बोलत होते.
हिंदवी स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे !
गोमाता, भारतमाता, वेदमाता यांसारख्या ७ मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला सिद्ध असणे, म्हणजे हिंदवी स्वराज्याचे व्रत आहे. हिंदवी स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे, असेही पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी सांगितले.
सोलापूर येथील महिला संघटनेकडून पू. गुरुजींवर टीका !
सोलापूर येथील ‘वर्ल्ड ऑफ वुमन्स’ या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी ‘संभाजी भिडे यांनी महिलांविषयी वादग्रस्त बोलू नये, अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू’, असे विधान केले आहे. ‘महिलांनी कोणता पेहराव करावा ?, हे सांगणारे भिडे कोण आहेत ? आम्ही त्यांच्या धोतराविषयी बोललो आहोत का ?’, असे लोलगे म्हणाल्या. (पू. भिडेगुरुजी यांचे कार्य, त्यांची महत्ता आणि त्यांचे वय यांचा विचार टीका करणार्यांनी केला आहे का ? केवळ प्रसिद्धीसाठी अशी टीका केली जात नाही ना ? – संपादक)
संपादकीय भूमिकाएका वयोवृद्ध हिंदुत्वनिष्ठ प्रमुखांना नोटीस बजावणारे पोलीस कधी हिंदु धर्मावर टीका करणारे धर्मांध, जात्यंध आदींना नोटीस बजावतात का ? |