Rahul Gandhi Hindu Remark : कर्णावती (गुजरात) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड !
राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदुविरोधी वक्तव्यांमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त
कर्णावती – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये ‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, तेच २४ घंटे हिंसाचार करतात’, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याच्या विरोधात गुजरातमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे कार्यालय असलेले ‘राजीव गांधी भवन’ येथे निदर्शने केली. या वेळी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदुविरोधी वक्तव्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रचंड संतापले होते. या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करणारी भीत्तीपत्रके कार्यालयात चिकटवून संताप व्यक्त केला.