पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये
श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान
‘काळ्या रंगाची, बटबटीत डोळ्यांची, दोन्ही हात कटीवर (कमरेवर) ठेवलेली आणि विटेवर उभी, अशी श्री विठ्ठलाची मूर्ती असते. पुंडलिकाने केलेल्या आई-वडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन श्री विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने श्री विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात श्री विठ्ठल उभा राहिला. अन्य देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षीभावाने पहाणारा
श्री विठ्ठल त्यात दाखवला आहे. कटीच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कटीवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये नियंत्रणात असलेला.’