संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

२८.६.२०२४ पालखीचे प्रस्थान आणि इनामदार वाड्यात पहिला मुक्काम

२९.६.२०२४ आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसरा मुक्काम

३०.६.२०२४ आणि १.७.२०२४ पुण्यात नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम

२.७.२०२४ लोणी काळभोरकडे रवाना

३.७.२०२४ यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्काम

४.७.२०२४ वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम

५.७.२०२४ उंडवडी गवळ्याची येथे मुक्काम

६.७.२०२४ बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम

७.७.२०२४ सणसर येथे मुक्काम

८.७.२०२४ बेलवडी येथे पहिले रिंगण होईल आणि आंथुर्णे येथे मुक्काम

९.७.२०२४ निमगाव केतकी येथे मुक्काम

१०.७.२०२४ इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण

१२.७.२०२४ सकाळी महाराजांच्या पादुकांना सराटी येथे नीरा नदीत स्नान घालून पालखी पुढे अकलूजकडे मार्गस्थ होईल आणि तेथे दुपारी तिसरे गोल रिंगण

१३.७.२०२४ माळीनगर येथे पहिले उभे रिंगण. त्यानंतर बोरगावला मुक्काम

१४.७.२०२४ सायंकाळी तोंडले बोंडले येथे धावा होईल आणि पिराची कुरोली येथे मुक्काम

१५.७.२०२४ सायंकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण

१६.७.२०२४ सकाळी वाखरी येथून पंढरपूरकडे प्रस्थान. सायंकाळी पादुका आरतीस्थळी शेवटचे आणि तिसरे उभे रिंगण.