अल्पवयीन मुलाला दिलेल्या जामिनाच्या विरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार !
पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुख्य आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत. याविषयी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने पुणे पोलिसांना तशी अनुमती दिली आहे. लवकरच पुणे पोलिसांकडून प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली आहे. मुलाची आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘मुलाची सुटका करण्याची’ याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी मुलाची मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २५ जून या दिवशी त्या मुलाची बाल सुधारगृहातून सुटका करण्यात आली होती.