‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे लाभ कुणाला मिळणार ?
योजनेनुसार प्रतिमहिना १ सहस्र ५०० रुपये महिलांच्या थेट अधिकोष खात्यांमध्ये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० सहस्र रुपयांपेक्षा अल्प हवे. त्यात विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळणार असून लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. ही लाभ योजना २१ वर्षांपासून ६० वर्षांच्या आतील महिलांना मिळेल.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे लाभ कुणाला मिळणार नाहीत ?
ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. सरकारी (राज्य आणि केंद्र) किंवा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा निवृत्तीवेतन घेणार्या कुटुंबातील महिला, कुटुंबातील सदस्य आमदार, खासदार विद्यमान किंवा माजी असेल, तसेच कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे ५ एकरपेक्षा अधिक शेतभूमी, चारचाकी वाहन आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.