७५ सहस्र कामगारांवर अन्याय करणार्या निविदा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत
विधान परिषद लक्षवेधी…
मुंबई, १ जुलै (वार्ता.) – मुंबई येथील झोपडपट्टीमधील स्वच्छतेचे काम सामाजिक संस्थांकडून काढून घेऊन एका कंत्राटदाराला ४ वर्षांसाठी देण्याचा घाट मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांनी वरिष्ठाच्या पाठबळामुळे घातला होता. या प्रकरणी १ जुलै या दिवशी विधान परिषदेत भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करून ‘७५ सहस्र कामगारांवर अन्याय करणारी निविदा तात्काळ रहित करावी आणि सेवाभावी संस्थांच्या कर्मचार्यांचे मानधन वाढवावे’, अशी मागणी केली. ‘त्यांच्या या मागणीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निविदा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात येईल’, असे घोषित केले.