जगातील समस्त दुःखाचे कारण म्हणजे दुर्बलता !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
बल हेच जीवन होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू. बल हाच परम आनंद होय, शाश्वत आणि अमर जीवन होय. दुर्बलता, म्हणजे सतत भार, चिंता आणि दुःख होय. दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय. या जगातील समस्त दुःखाचे कारण, म्हणजे दुर्बलता हेच होय. आपण शक्तीहीन आहोत; म्हणूनच आपल्याला दुःख भोगावे लागते. दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो आणि अन्य गुन्हे करतो, दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत (दरीत) पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्यूमुखी पडतो.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)