जिज्ञासू श्री. अमोल खोडे यांना साधना शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
‘१.१२.२०२३ ते ३.१२.२०२३ या कालावधीत सनातन संस्थेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या ३ दिवसांच्या ‘मराठी साधना शिबिरा’मध्ये साक्षात् भगवंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला सहभागी होता आले. तेव्हा मला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सनातनच्या आश्रमासंदर्भात आलेल्या अनुभूती
अ. आश्रमामध्ये येताच एका सिद्ध (जागृत) देवस्थानात आल्याची मला अनुभूती आली.
आ. मी एका महान तीर्थस्थळी पोचू शकलो आणि येथे पोचताच मला चैतन्याची अनुभूती आली.
इ. ‘या संधीचे सोने करावे’, असे मला वाटले आणि माझी भावजागृती झाली.
ई. सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात आरती झाल्यानंतर मी निरांजनातील ज्योतीला दुरून नमस्कार केला. तेव्हा माझ्या उजव्या हाताच्या अनामिकेला त्या ज्योतीचा चटका जाणवला. या अनुभूतीमुळे मी भावविभोर झालो.
२. शिबिरात शिकायला मिळालेली सूत्रे
अ. अध्यात्म, हिंदु धर्म, सनातन संस्कृती आणि मोक्ष, तसेच ‘धार्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य काय ?’, याचा मला बोध झाला. मला ईश्वरप्राप्ती करण्याचा आणि मोक्षाकडे जाण्याचा मार्ग मिळाला.
आ. मला गुरुकृपायोग आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाविषयी शिकायला मिळून एक मौलिक दिशा मिळाली.
इ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या या ईश्वरी कार्यामध्ये सर्वतोपरी योगदान देण्यासाठी मी कटीबद्ध झालो.’
– श्री. अमोल सुभाषराव खोडे (वय ४० वर्षे), अमरावती (१९.१२.२०२३)