श्रीमती छाया मिराशी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती
‘मी १९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मराठी सत्संगसेवक शिबिरा’त सहभागी झाले होते. तेव्हा आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले असतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. मी नामजप करत असतांना माझा नामजप एकाग्रतेने होत होता. त्या वेळी मला सूक्ष्मातून काही चेहरे दिसले; पण मला त्यांची भीती वाटली नाही.
२. आरतीच्या वेळी शंखनाद चालू झाल्यावर ‘माझे मन, बुद्धी, चित्त आणि देह यांवरील आवरण वर्तुळाकार स्पंदनांनी नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.
३. श्रीकृष्ण आणि सद्गुरूंची आरती चालू असतांना मी तेथे असूनही मला ती ऐकू आली नाही. माझे मन शांत होते. आरती झाल्यावर मी डोळे उघडले. तेव्हा कपाळाच्या उजव्या बाजूला थोडा जडपणा जाणवला.’
– श्रीमती छाया मिराशी (वय ६७ वर्षे), पुणे (२१.१.२०२४)
|