US Military Bases : अमेरिकन सैन्यदलाच्या तळांवर आतंकवादी आक्रमणाचा धोका !
बर्लिन – युरोपातील अमेरिकेच्या सैन्यदलाचे अनेक तळ हे सध्या आतंकवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. या तळांवर संभाव्य आतंकवादी आक्रमणाचे वृत्त मिळाल्यानंतर अमेरिकेच्या तेथील सैन्यदलांना सतर्क करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या तळांवर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. या सैन्यदल तळांनी ‘फोर्स प्रोटेक्शन कंडिशन’ ‘चार्ली’ पर्यंत सतर्कतेची पातळी वाढवली आहे. जेव्हा गंभीर आतंकवादी आक्रमणाची गुप्त माहिती प्राप्त होते, तेव्हा अमेरिकी सैन्यदलाकडून या पातळीची सुरक्षा लागू केली जाते.
१० वर्षांत पहिल्यांदाच अशा सतर्कतेची चेतावणी !
युरोपमधील तळावर तैनात असलेल्या एका अमेरिकी अधिकार्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, अशा सतर्कतेचा अर्थ सैन्यदलाला आक्रमणाशी संबंधित विश्वसनीय माहिती मिळाली आहे. कोणत्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा वाढवण्यात आली आहे, याविषयी त्याने स्पष्ट माहिती दिली नाही.