Russia Hindu Temple : मॉस्को (रशिया) येथे हिंदु मंदिराच्या उभारणीची मागणी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आधी हिंदूंकडून मागणी व्यक्त !
मॉस्को (रशिया) – पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच रशियाच्या दौर्यावर येणार आहेत. या दृष्टीकोनातून तेथील हिंदूंनी शहरात हिंदु मंदिर उभारण्याची मागणी केली आहे. ख्रिस्ती लोकसंख्या सशक्त असूनही रशियामध्ये हिंदु मंदिरे आणि समुदाय गट दिसू लागले आहेत. रशियातील भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र ‘सीता’चे अध्यक्ष सॅमी कोतवानी यांनी मॉस्कोत पहिले हिंदु मंदिर बांधण्याचा मानस व्यक्त केला आहे.
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी संयुक्त अरब अमिरातीत पहिल्या हिंदु मंदिराचे उद़्घाटन केले. रशियामध्ये हिंदु मंदिरे आणि सांस्कृतिक केंद्रे महत्त्वाची आहेत; कारण ती समुदायासाठी सुरक्षित जागा दर्शवतात. रशियामधील हिंदु संघटना धार्मिक गट, तसेच समुदाय उभारणी उपक्रमांचे केंद्र म्हणून काम करतात.
२. मॉस्कोमध्ये हिंदूंशी संबंधित अनेक आध्यात्मिक ठिकाणे आहेत. आता मॉस्कोमधील भारतीय समुदायाने मंदिर बांधण्याची मागणी केली आहे.
३. रशियाचा कायदा लोकांना मुक्तपणे त्यांच्या धर्माचे पालन करण्याची अनुमती देतो. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे इस्कॉनची मंदिरे आहेत. तथापि इस्कॉन मंदिर एका साध्या इमारतीच्या आत आहे. हेसुद्धा भारतीय समुदाय पालटू इच्छित आहे.
संपादकीय भूमिकाविदेशातील हिंदु समुदायाकडून हिंदु मंदिराची मागणी होणे स्वागतार्ह आहेच ! असे असले, तरी तेवढ्यापर्यंत सीमित राहून चालणार नाही, तर तेथील हिंदूंना धर्मशिक्षित करणे, तसेच हिंदूंच्या जागतिक संघटनामध्ये रशियन हिंदूंनी भूमिका बजावणे हेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे ! |