Rahul Gandhi On Hindus : (म्हणे) ‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, तेच २४ घंटे हिंसाचार करतात !’ – राहुल गांधी
|
नवी देहली – जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते २४ घंटे हाणामारी आणि हिंसाचार यांत गुंतलेले असतात, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांच्या या विधानावरून सभागृहात गदारोळ झाला.
Those who call themselves Hindus commit violence 24 hours a day ! – Rahul Gandhi
Uproar in the Lok Sabha after #RahulGandhi‘s outrageous statement on Hindus and display of deity Shiv !
Hindus are tolerant and passive, which is why Rahul Gandhi is using Hindu deities in such a… pic.twitter.com/J2GJGMdmCK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 1, 2024
यावर लगेच स्पष्टीकरण देतांना राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान मोदी, भाजप आणि रा.स्व. संघ यांना हिंसाचारी म्हटले असून संपूर्ण हिंदु समाज असा नाही’, असे म्हटल्याचा दावा केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत पंतप्रधान मोदी उभे राहून म्हणाले, ‘हे सूत्र अतिशय गंभीर आहे. संपूर्ण हिंदु समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर गोष्ट आहे.’ त्यावर राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हा संपूर्ण हिंदू समाज नाही. रा.स्व. संघ हा संपूर्ण हिंदू समाज नाही.’
#WATCH | After LoP Lok Sabha Rahul Gandhi attacks him, PM Modi responds by saying, “Calling the entire Hindu community violent is a very serious matter.” pic.twitter.com/HrpCvLg3hF
— ANI (@ANI) July 1, 2024
राहुल गांधी यांनी क्षमा मागावी ! – अमित शहा
राहुल गांधी यांच्या विधानावरून गदारोळ चालू असतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले की, मी पुन्हा पुन्हा सांगतो की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसाचारावर बोलतात. कदाचित् त्यांना ठाऊक नसेल की, या देशात कोट्यवधी लोक अभिमानाने स्वतःला हिंदु म्हणवतात. ते सर्व लोक हिंसाचाराविषयी बोलतात का ? हिंसाचाराची भावना कोणत्याही धर्माशी जोडणे योग्य नाही. घटनात्मक पद भूषवणार्या राहुल गांधी यांना क्षमा मागितली पाहिजे.
Rahul Gandhi should apologize ! – Amit Shah in #LokSabha
RaGa remains silent about the fanatic Mu$l!ms who attack Hindus daily and calls Hindus “violent” (Hinsak)!
If Hindus were violent, not a single person of the minority community would be existing in this country!
On… pic.twitter.com/t8gvtMv6Zo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 1, 2024
‘घाबरू नका’ असा सर्व धर्माचा संदेश ! – राहुल गांधी
राहुल म्हणाले गांधी पुढे म्हणाले की, कुराणात लिहिले आहे की, पैगंबर म्हणाले, ‘घाबरण्याची आवश्यकता नाही.’ तुम्हाला गुरु नानकजींच्या चित्रात अभय मुद्रा दिसेल. ते म्हणतात ‘घाबरू नका, घाबरवूही नका.’ येशू ख्रिस्ताच्या चित्रातही अभय मुद्रा आहे. येशू म्हणाले होते, ‘जर तुम्हाला कुणी चापट मारली, तर दुसरा गाल पुढे करा.’ (इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजधानी देहलीमध्येच साडेतीन सहस्र शिखांचे हत्याकांड काँग्रेसवाल्यांनी केले त्याविषयी राहुल गांधी कधी का बोलत नाहीत ? काँग्रेसवाल्याचे बोलणे आणि करणे, हे वेगवेगळे आहे ! – संपादक)
राहुल गांधी यांनी सभागृहात दाखवले भगवान शंकराचे चित्र !याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भगवान शिवाचे चित्र दाखवून भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी लोकसभा अध्यक्षांना म्हणाले की, तुम्ही इथे ५५ घंटे बसला आहात, तुम्ही दगडासारखे आहात, तुम्ही हलत का नाही ? आजच्या माझ्या भाषणात मला भाजप आणि संघ यांना सांगायचे आहे की, ही आमची कल्पना आहे जी संपूर्ण विरोधी पक्ष वापरत आहे. त्यामुळे न घाबरता पुढे जाण्याचे बळ मिळते. असे बोलत राहुल गांधी यांनी भगवान शंकराचे चित्र हातात घेतले. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अडवले. त्यावर गांधी म्हणाले की, येथे भगवान शिवाचे चित्र दाखवण्यास मनाई आहे का ? हे चित्र संपूर्ण भारताच्या हृदयात आहे. प्रत्येकाला ही प्रतिमा ठाऊक आहे. जेव्हा भगवान शिव स्वतःच्या गळ्यात नाग लपेटतात, तेव्हा ते म्हणतात ‘मी वास्तव स्वीकारतो.’ त्यांच्या डाव्या हाताला त्रिशूळ आहे. त्रिशूळ हिंसेचे प्रतीक नसून ते अहिंसेचे प्रतीक आहे. जर ते हिंसेचे प्रतीक असेल, तर ते उजव्या हातात असते. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना राहुल गांधी यांनी विचारले की, या सभागृहात भगवान शिवाचे चित्र दाखवण्यास मनाई आहे का ? या घरात भगवान शिवाचे चित्र दाखवता येत नाही का ? यावर अध्यक्ष बिर्ला यांनी कायद्यातील नियमांचा हवाल देत चित्र न दाखवण्यास सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांनी चित्र दाखवणे थांबवले. संपादकीय भूमिकाराहुल गांधी कधी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे चित्र सभागृह दाखवून विधाने करू शकतील का ? हिंदू सहिष्णू आणि निद्रिस्त असल्याने राहुल गांधी हिंदूंच्या देवतांचा असा प्रकारे वापर करून त्यांचा अवमानच करत आहेत ! |
आमचे सरकार आले, तर अग्नीवीर योजना बंद करणार ! – राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले की, अग्नीवीर योजना सैन्याच्या विरोधात आहे, देशाच्या विरोधात आहे. सरकार तरुणांच्या विरोधात आहे. आमचे सरकार आल्यावर ही योजना बंद करू. तुम्ही अग्नीवीराला ६ महिन्यांचे प्रशिक्षण देता, तर दुसरीकडे चिनी सैनिक ५ वर्षे प्रशिक्षण घेतो. सरकार सैनिकांमध्ये फूट निर्माण करून स्वतःला देशभक्त म्हणवत आहे. ही कसली देशभक्ती? मी पंजाबमध्ये वीरगतीला प्राप्त झालेल्या अग्नीविराच्या कुटुंबाला भेटलो. सरकार त्या सैनिकाला हुतात्मा मानत नाही. अग्नीवर सैनिक वापरा आणि फेका, असा कामगार आहे.
राहुल गांधी यांच्या या विधानावर गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, हे सभागृह खोटे बोलण्याची जागा नाही. विरोधी पक्षनेत्यांनी सभागृह आणि अग्नीवीर यांची क्षमा मागावी.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा अग्नीवीर सैनिक वीरगतीला प्राप्त होतो, तेव्हा त्याच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये दिले जातात. राहुल गांधी खोटी विधाने करून सभागृहाची दिशाभूल करत आहेत.
संपादकीय भूमिका
|