Bengal Couple Beaten : विवाहबाह्य संबंधांवरून तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्याकडून एका जोडप्याला भर रस्त्यात काठीद्वारे अमानुष मारहाण !
बंगालमध्ये धर्मांध मुसलमानांकडून शरीयत कायद्यानुसार कृती !
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील दक्षिण दिनाजपूर येथील चोप्रा ब्लॉक परिसरात एक मुसलमान विवाहित महिला आणि पुरुष यांना भर रस्त्यात दिवसाढवळ्या काठीने मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर वाद निर्माण झाला आहे. विवाहबाह्य संबंधावरून या दोघांना मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मारहाण करणार्या ताजमूल इस्लाम उपाख्य जेसीबी याला अटक करण्यात आली आहे. ताजमूल इस्लाम तृणमूल काँग्रेसचा स्थानिक पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. मारहाणीची घटना चालू असतांना तेथे मोठा जमाव होता. त्यातील १-२ जणांनी ताजमूल याला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने मारहाण थांबवली नाही. या घटनेवरून भाजप, माकप आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. विशेष म्हणजे ज्यांना मारहाण झाली त्या महिला आणि पुरुष यांनी मारहाणीनंतरही ३ दिवस तक्रार केली नव्हती. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद करून इस्लाम याला अटक केली.
Bengal Couple Beaten: A couple brutally beaten with a stick on the road by a Trinamool Congress official alleging their involvement in an extramarital affair!
There is a judicial system against such acts in Muslim Rashtra ! – TMC MLA Hamidul Rehman
In Bengal, actions are taken… pic.twitter.com/655fvKcPqV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 1, 2024
भाजपकडून टीका
केंद्रातील राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुझुमदार यांनी म्हटले की, बंगालमध्ये तालिबान राजवट निर्माण झाली आहे. मारहाण करणारी व्यक्ती ही तृणमूलच्या आमदाराची समर्थक आहे. याप्रकरणात प्रशासन आणि पोलीस कुठेच दिसत नाहीत.
मुझुमदार यांनी ‘आमदार रहमान यांनी इस्लामी राष्ट्रातील कोणत्यातरी कायद्याप्रमाणे अशी शिक्षा करण्याचे प्रावधान आहे’, असे म्हटले. हा गंभीर चिंतेचा विषय आहे’, अशी टीका केले.
ताजमूल यांच्या भूमिकेची चौकशी करणार ! – तृणमूल काँग्रेस
तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कन्हैयालाल अग्रवाल यांनी पक्षावर होणार्या टीकेवर म्हटले की, मारहाण करण्यात आलेल्या महिला आणि पुरुष यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. हे परिसरातील लोकांना अमान्य होते. म्हणून येथे सभा घेण्यात आली होती; परंतु ताजमूल याने जे केले त्याचे आम्ही समर्थन करत नाही. आम्ही त्याच्याही भूमिकेची चौकशी करणार आहोत.
अशा कृत्याच्या विरोधात इस्लामी राष्ट्रांत न्याय पद्धती आहे ! – तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदूल रहमान
तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदूल रहमान म्हणाले की, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या आरोपीचा पक्षाशी काहीच संबंध नाही. त्याच्याकडे पक्षातील कोणतेही पद नाही. चोप्रातील प्रत्येकजण तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो; पण त्या महिलेनेही चुकीचे कृत्य केले. तिने स्वतःचा नवरा, मुलगा आणि मुलगी यांना सोडून दिले आणि ती दुष्ट बनली. अशा कृत्याविरोधात मुसलमान राष्ट्रांत काही नियम आणि न्याय पद्धती आहे. तरीही जे झाले, ते थोडे अती होते. आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
तृणमूलचे गुंड स्वतः सुनावणी करून शिक्षा देत आहेत ! – माकप
माकपचे राज्य सचिव आणि माजी खासदार महंमद सलीम यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, हे कांगारू न्यायालयापेक्षाही (न्यायालयावर टीका करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द) वाईट आहे. जेसीबी म्हणून ओळखला जाणारा तृणमूल काँग्रेसचा गुंड स्वत: खटला ऐकतो आणि शिक्षा देतो. व्हिडीओ चित्रीत करणार्या व्यक्तीला आता घरातून हाकलून देण्यात आले आहे. चोप्रामध्ये बंगाल पोलिसांच्या देखरेखीखाली तृणमूलची अशी सत्ता आहे. ताजमूल स्थानिक डावे नेते मन्सूर आलम यांच्या हत्येच्या प्रकरणीही आरोपी आहे.
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये शरीयतच लागू होणार आहे, हेच यातून स्पष्ट होते ! हिंदूंनी याकडे आता गांभीर्याने पहात तेथील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्यक आहे ! |