राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक !
मुंबई – राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली जाणार आहे. सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर निवृत्त होत आहेत. सुजाता सौनिक या भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८७ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमताने सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी निवड केली आहे.
सुजाता सौनिक यांच्याकडे सध्या राज्याच्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार आहे. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम केले आहे.