कर्तव्यावर घायाळ झालेला कामगार बरा होईपर्यंत वेतन द्यावे लागणार ! – सुरेश खाडे, कामगारमंत्री
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/06/30232509/suresh-khade_01.jpg)
मुंबई, ३० जून (वार्ता.) – ‘एखादा कामगार कर्तव्यावर असतांना अपघातात तो घायाळ झाल्यास तो बरा होऊन पुन्हा कामावर येईपर्यंत त्याचे निर्धारित वेतन नियमित चालू राहील. ते प्रतिमहिन्याला त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोचवण्याचे दायित्व संबंधित आस्थापनाचे असेल, असा नियम कामगार विभागाकडून सिद्ध केला जात आहे. येत्या ८ दिवसांत त्याविषयी घोषणा केली जाईल’, अशी माहिती कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी २९ जून या दिवशी विधानसभेत लक्षवेधील उत्तर देतांना दिली.